Ganpati Aarti in Marathi Lyrics (गणपती आरती)

Ganpati Aarti in Marathi Lyrics : सर्वात लोकप्रिय मराठीतील Ganpati आरती म्हणजे ‘सुखकर्ता दुःखहर्ता ‘ , जी १७ व्या शतकात संत रामदास स्वामींनी रचली होती. महाराष्ट्रात, विशेषतः गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या प्रत्येक गणेशपूजेत, सकाळी आणि संध्याकाळी ही आरती अत्यंत भक्तीभावाने म्हटली जाते. ganpati 2026 ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या आरतीचे पूर्ण शब्द संत रामदास स्वामींनी रचले आहेत. 

Ganpati Aarti(गणपती आरती) 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची  

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची  

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची  

कंठी झळके माळ मुक्ताफळांची  

जय देव जय देव जय मंगलमूर्ती  

दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥१॥

|| जय देव जय देव ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा  

चंदनाची उटी कुंकुमकेशरा  

हिरेजडित मुकुट शोभतो बरा  

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया  

जय देव जय देव जय मंगलमूर्ती  

दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥२॥

|| जय देव जय देव ||

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना  

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना  

दास रामाचा वाट पाहे सदना  

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना  

जय देव जय देव जय मंगलमूर्ती  

दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥३॥

|| जय देव जय देव ||

Ganpati Aarti  महत्त्वाचे भाग : 

पहिल्या कडव्याचा अर्थ –

Ganpati आपल्या भक्तांच्या जीवनात सुख देतो  आणि दुःख दूर करतो . गळ्यात मोत्यांची माळ आहे आणि रूप शेंदुराने शोभून दिसते. 

दुसरे कडवे अर्थ – 

गणपतीच्या दर्शनाने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. गणपतीच्या मस्तकावर रत्नांची सजावट, अंगावर चंदन-कुंकू-केशराचा लेप आहे आणि पायांमधील पैंजणांचा मधुर असा आवाज येतो .

तिसरे कडवे अर्थ – 

लंबोदर गणपतीने  पिवळ्या रंगाचे धोतर परिधान केलेले असून तीन नेत्र आहेत. भक्तांची संकटे दूर करतात आणि त्यांना मोक्ष प्रदान करतात. 

Ganpati Aarti (गणपती आरती कोणी रचली?)

१७ व्या शतकात संत रामदास स्वामींनी रचली होती.

गणपती आरती अर्थ काय आहे?

गणपती आपल्या भक्तांच्या जीवनात सुख देतो  आणि दुःख दूर करतो, गणपतीच्या दर्शनाने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात.

Leave a Comment