शंकराची आरती/लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा/ Shankarachi Aarti /Lavthavti Vikrala Aarti
Shankarachi Aarti / शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ …