Mahalakshmi Aarti
Mahalakshmi Aarti सारांश
Mahalakshmi Aarti मध्ये देवीच्या ऐश्वर्या, समृद्धी आणि मंगलमय रूपाचे वर्णन केले आहे. महालक्ष्मी आरती शेकडो वर्षापासून प्रचलित आहे. संत परंपरेतून आणि भक्तांच्या श्रद्धेतून पुढे आली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासावरून १८ व्या शतकात Mahalakshmi Aarti प्रसार सुरु झाला.
Mahalakshmi Aarti गौरीपूजन, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताला आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये विशेष म्हटले जाते. आरतीच्या प्रत्येक ओळीमध्ये देवीच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे.
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूल लक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥१॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूल लक्ष्मी॥धृ ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटक वाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥२ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूल लक्ष्मी॥धृ ॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी॥३॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूल लक्ष्मी॥धृ ॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी॥ ४ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूल लक्ष्मी॥धृ ॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निज-भाळी।
पुसोनि चरणतळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाकी ॥५॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूल लक्ष्मी॥धृ ॥

आरती बद्दल लोकांना नेहमी पडणारे प्रश्न ❓
महालक्ष्मी आरती कोणी रचली?
Mahalakshmi Aarti संत परंपरेतून आलेली असून महालक्ष्मी मंदिरात विशेष म्हटली जाते.
सांस्कृतिक महत्त्व काय आहे?
महाराष्ट्रात गौरी पूजेच्या वेळेस ,दिवाळी , मार्गशीर्ष गुरुवार आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भक्तिभावाने म्हटली जाते.
आरतीत देवीचे कोणते रूप वर्णन केले आहे?
करवीरपुरवासिनी, कमलाकार, सहस्त्रवदनी, असुरसंहारिणी विविध अशा रूपांचे वर्णन केले आहे.