Vasubaras 2026 : वसुबारस पूजा करण्याची योग्य पद्धत

Vasubaras 2026 वसुबारस’ या शब्दाचा अर्थ 

वसु म्हणजे धन, संपत्ती किंवा गाय.

बारस म्हणजे द्वादशी .

Vasubaras 2026 पौराणिक / धार्मिक महत्त्व 

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस केली जाते. गोवस्य द्वादशी म्हणजे गाई आणि वासराची पूजा या दिवशी करण्यात येते. वसुबारस म्हणजे वसु (द्रव्य) धन आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवशी वसुबारस म्हणजेच गोवस्य द्वादशी असे म्हटले जाते. 

या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. नंदा नावच्या कामधेनूला उद्देशून वसुबारस हा सण साजरा केला जातो. समुद्रमंथनातून ज्या पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यातील एक म्हणजे नंदा.

गाईला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान दिलेले आहे म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाय आणि वासराची पूजा वसुबारस या दिवशी केली जाते.

Vasubaras 2026 पूजा आणि साहित्य 

वसुबारसेच्या दिवशी अंगणात रांगोळी काढून त्या भोवती दिवे लावतात आणि या दिवशीच दिवाळीची सुरुवात होते. ज्यांच्या घरी गाई ,वासर आहेत असे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक नैवेद्य म्हणून केला जातो.

सौभाग्यवती स्त्रिया  उपवास करून सायंकाळी वासरासह असलेल्या गाईची पूजा करतात.

गाई आणि वासराला अंघोळ घालतात. 

त्यांच्या अंगावरती नवीन वस्त्र टाकून,हळदी- कुंकू अक्षदा, फुलांची माळ त्यांना घातली जाते. 

गाई वासराला नमस्कार करून नैवेद्य दाखवावा जसे हरभरा, पुरणपोळी किंवा गूळ असे गोड पदार्थ अर्पण करावे. गाईला हिरवा चारा पण खाऊ घालावा. 

आरती करावी Kamadhenu Aarti 2026: Lyrics in Marathi | कामधेनुची आरती , दिवा लावून गाईची वासराची आरती करून घ्यावी,गाई वासराला प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घ्यावा, सर्व कुटुंबियांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करायची.

घरी गाय वासरू नसेल तर गायची प्रतिमा म्हणून फोटो अथवा मूर्ती पाटावर ठेवून रांगोळी काढून त्याची पूजा करावी.

कामधेनुची आरती 

आरती कामधेनु 

तुमचा महिमा किती वर्णु

आरती मोक्षधेनु ।। धृ ।।

गाईचे चरणतीर्थ ब्रह्मा विष्णु महेश्वर

म्हणुनि वंदिले यथार्थ 

शोडषोपचारी मंत्र 

नमियेला भगवंत 

आरती कामधेनु ।। १ ।।

तुझी सोनियाची शिंगे 

त्याला रूपियाचे खुर

पुच्छ तुझे वाहे गंगा 

पाप जाईल हो दूर 

आरती कामधेनु ।। २ ।।

विठोबा रखुमाई दोघे

गाई आणियेला वळवुनी

दूध जे काढियेलं

दिलं रखुमाई करी 

आरती कामधेनु ।। ३ ।।

Vasubaras 2026 काही नियम आणि उपवास 

घरातील स्त्रिया वसुबारसेच्या दिवशी कुटुंब सुख-समृद्धीसाठी उपवास करतात. 

या दिवशी जेवणात गहू आणि मुग वापरले जात नाही, तसेच दुग्धजन्य पदार्थ , तव्यावर बनवलेले आणि तळलेले पदार्थ आज खात नाही.

काही भागात उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी वसुबारसेच्या दिवशी खातात.

About Us

https://www.facebook.com/share/p/1JVgybfdwc

वसुबारस faq

वसुबारस म्हणजे काय ? 

वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस आहे. गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्याची परंपरा वसुबारसच्या दिवशी आहे.

वसुबारस कधी साजरी करतात ? 

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा करतात.

वसुबारसला कोणाची पूजा करतात ?

वसुबारसच्या दिवशी पवित्र मानली जाणारी ‘कामधेनु’ (गाय) आणि तिच्या वासराची पूजा करतात.

Leave a Comment