Vasubaras Katha
एका नगरात एक वृद्ध महिला राहत होती. तिचा मुलगा आणि सून तिच्यासोबत राहत होते, घरी गाई ,वासर, म्हशी, गव्हाळे, मुगाळे असे वासरे जनावरे होते. अश्विन मासाच्या पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारून म्हणाली गव्हाळे मुगळे शिजवून ठेव आणि ती शेतात निघून गेली. नंतर सून गोठ्यात गेली आणि गव्हाळी मुगळे वासरे उड्या मारत पाहून त्यांना ठार मारलं आणि शिजवून सासूची वाट बघत बसली. दुपारी जेवणाच्या वेळी म्हातारी घरी आली सुनेने जेवणाचे ताट वाढले आणि म्हातारीने ताटात पाहिले तर तांबड्या मासाचे जेवण दिसले. म्हातारी घाबरून बोलली हे काय ?? सुनेने जे काही सगळे झाले ते सगळे म्हातारीला सांगितले. म्हातारी घाबरली आणि देवा हे काय झाले न समजता चुक झाली म्हातारी देवापाशी जाऊन बसली प्रार्थना करायला लागली. सुनेच्या हातून नकळत आपल्यात घडला आहे तिला क्षमा करा, गाईचे वासरं जिवंत करा असं तुम्ही नाही केले नाही तर मी माझा प्राण देईल! असा आग्रह करून म्हातारी देवापाशीच बसली दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहून. सायंकाळी गाई आल्या अंबरडा फोडू लागल्या. तशी देवाची चिंता वाढली हिचा निश्चय सुटणार नाही असं देवाला वाटले, देवाने गायची वासर जिवंत केली. वासर उड्या मारत- मारत गायजवळ गेली. गाईचे हंबरणे बंद झाले , म्हातारी उठून दारापाशी गेली आणि आनंदाने हसू लागली, सुनेला पण आनंद झाला. नंतर म्हातारीने आणि सुनेने गाईची आणि वासरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दिला. या दिवशी म्हणजे वसुबारच्या दिवशी नैवेद्यात गाईला उडदाचीच वडे खायला देतात.
Also read : Vasubaras 2026 : वसुबारस पूजा करण्याची योग्य पद्धत
Vasubaras Katha Image

https://www.facebook.com/share/p/1CRncft2Qj
Vasubaras Katha Faq
वसुबारसची कथा कोणाशी संबंधित आहे?
नंदा नावच्या कामधेनूला उद्देशून वसुबारसची कथा संबंधित आहे .
वसुबारस कथेमध्ये गायीचे महत्त्व काय सांगितले आहे?
गाय समृद्धी, पोषण आणि मातृत्वाचे प्रतीक आहे.
वसुबारसला “गोवत्स द्वादशी” का म्हणतात?
“गो” म्हणजे गाय आणि “वत्स” म्हणजे वासरू.