Dhantrayodashi 2026 : महत्त्व
दसरा, कोजागिरी चालू असतानाच आपल्याला दिवाळीची चाहूल लागते. दिवाळी हा सण अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीये पर्यंत साजरी करतात. दिवाळी हा सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि सुखाचा क्षण आपण साजरा करतो, जसे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन ,बलिप्रतिपदा आणि शेवटचा म्हणजे भाऊबीज बहिण-भावाचा दिवस.दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि त्यानंतर धनत्रयोदशी येते. धनत्रयोदशी अश्विन कृ. त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असे म्हणतात. धनतेरस या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी धनाची आणि आयुर्वेद म्हणजेच आयुर्वेदिक औषधांची देखील पूजा करतात.धनत्रयोदशी दिवशी सर्वजण धन्वंतरी देवतेचे मनापासून पूजन करतात. कारण आयुर्वेदाला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे भाग मानले जाते. आयुर्वेदाचा अर्थ ‘आयुचे म्हणजेच मानव जीवनाचे ज्ञान’ . भारतीय आयुर्वेदिक ज्ञान जगभर पसरलेले आहे.
Dhantrayodashi 2026 : आख्यायिका
Dhantrayodashi 2026 दिवशी आपण आणखी एक गोष्टीचे स्मरण करतो. मंथनातून म्हणजेच क्षीरसागराच्या मंथनातून जे 14 रत्न बाहेर पडली, त्यात ‘ धन्वंतरी ‘ म्हणजेच चंद्राचा मोठा भाऊ म्हणून ओळखला जातो, ते म्हणजे पाचवे रत्न. माथ्यावर मुकुट, श्याम- वर्ण ,डाव्या हातात कुंभ आणि उजव्या हातात अभयकर असे आश्वासन देत असलेली धन्वंतरी ची मूर्ती, म्हणजेच धन्वंतरी असे धन्वंतरीचे वर्णन आहे. या मंथनामुळेच आयुर्वेदाचा विकास झाला त्यांना आधी देव ,अमृत योनी अशा विविध नावांनी देखील ओळखले जाऊ लागले. विविध प्रकारच्या वनस्पती ,औषधी झाडे देवतांना समजले. त्यामुळेच अनेक आयुर्वेदिक औषधे निर्माण झाली. भगवान विष्णूच्या 24 व्या अवताराला धन्वंतरीची गणना आहे.
Dhantrayodashi 2026 : पूजेचा शुभ मुहूर्त
Dhantrayodashi 2026 दिवशी प्रदोष काळात लक्ष्मी ,कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते.
प्रारंभ: 6 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:30 वाजता.
समाप्ती: 7 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:47 वाजता.
यमदीप दान मुहूर्त: 6 नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर यामध्ये दान करावे.
Dhantrayodashi 2026 पूजेचे साहित्य
हळदी, कुंकू ,अक्षदा, फुले, धूप ,दीप ,चौरंग, लाल किंवा पिवळा कपडा.
खरेदी केलेले सोने, चांदी किंवा भांडी ,धने, गूळ, नैवेद्यासाठी मिठाई.
Dhantrayodashi 2026 पूजा विधि
धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी केली जाते.
घर स्वच्छ करून दाराला तोरण लावणे, रांगोळी काढणे, दिवे लावणे.
चौरंगावर लाल किंवा पिवळा वस्त्र टाकून लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी यांची मूर्ती स्थापन करावी. सर्वात आधी गणेशा चे पूजन करावे.
दीप आणि धूप लावावे.
हळदी ,कुंकू ,अक्षदा ,फुले अर्पण करावे.
धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तूची खरेदी करण्याची परंपरा आहे. जसे सोने, चांदी किंवा भांडी त्यांची देखील पूजा करून घ्यावी.
धनत्रयोदशी दिवशी नैवेद्य म्हणून पेढे, मिठाई ठेवावी. धने आणि गुळाचा एकत्र नैवेद्य दाखवण्या ची पद्धत आहे.
आरती आणि मंत्राचा करावा.
यमदिपदान
धनत्रयोदशी दिवशी आणखी एक विशेष म्हणजे सायंकाळी दक्षिण दिशेकडे कणकेचा एक दिवा लावला जातो त्याला ‘यमदिप’ असे म्हणतात. तिळाच्या तेलाचा दिवा घराच्या दक्षिण बाजूला तोंड करून लावतात. दक्षिण दिशा ही धर्माची दिशा मानली जाते म्हणून इतर कोणत्याच दिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जात नाही. धर्मराज म्हणजेच यम हे मृत्यूची देवता आहे. धनत्रयोदशी दिवशी त्यांची देखील पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टाळतो.
यमदिप दान याची एक कथा आहे आपण यामध्ये दान का करतो ते या कथेत सांगितले आहे.
मंत्र – “मृत्युनां दण्डपाशाभ्यां कालेन शामया सह। त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम।।”

यमादिपदान कथा
एकदा धर्मराज म्हणजेच यमराज आपल्या दूतांना एक प्रश्न विचारले आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले, पण असे करताना तुम्हाला एकदा तरी असा प्रसंग घडला असेल की त्यामुळे तुम्हाला दुःख झाले असेल किंवा वाईट वाटले असेल? यमराज यांच्या दूतांनी विचार करून त्यांना सांगितले हो महाराज एक असा प्रसंग आहे जो मला आणखी पण आठवतो! त्यावर यमराज म्हणाले सांगा बरं! दूतांनी यमराज यांना सांगायला सुरुवात केली, महाराज पृथ्वीवर एक हेमराज नावाच्या राजाचा मुलगा होता त्याचे प्राण आम्हाला हरण करताना खूप दुःख झाले! यमराज म्हणाले असे काय होते म्हणून तुम्हाला एवढे दुःख झाले? महाराज हेमराज यांच्या राजकुमाराचे लग्न चार दिवसापूर्वी झाले होते. राज्यात राजवाड्या त सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. तो आनंद संपण्याच्या आतच म्हणजे राजकुमाराने आपल्या विवाहाचा शृंगार उतरवण्याच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आली. नुकतच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून राजकुमाराचे प्राण हरण करताना आम्हाला देखील रडायला आले आमचे डोळे ओले झाले. तिचा आणि सगळ्यांचा शोक पाहून आम्हाला वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराज म्हणजे धर्मराज यांना देखील वाईट वाटले त्यांच्या डोळ्यात पाणी आले. यावर दूत म्हणाले महाराज कृपया असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा! धर्मराज म्हणाले धनत्रयोदशीला जे लोक दिपदान देतील आणि पुढे पाच दिवस दिपउत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग कधीच येणार नाही. तेव्हापासून यमदिपदान ही प्रथा चालू आहे.
https://www.facebook.com/share/p/1EvDNFKSqa
Dhantrayodashi 2026 Faq
धनत्रयोदशीला काय खरेदी करावे!
सोने आणि चांदी, नवीन भांडी पितळ किंवा तांबे.
गोमती चक्र कवड्या ,श्री यंत्र.
धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये किंवा खरेदी टाळावी?
मान्यतेनुसार काही वस्तू खरेदी करू नये आणि कोणाला देऊ नये.
मीठ, तेल, तूप.
काळे कपडे काळ्या रंगाच्या वस्तू.
लोखंडाच्या वस्तू.
यमदिपदान म्हणजे काय?
धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावला जातो याला यमदिपदान म्हणतात. आपल्या कुटुंबाला, सहप्रेमीला आरोग्य लाभावे म्हणून यमदिपदान करतात.