Laxmi Pujan 2026 :लक्ष्मीपूजन तारीख ,शुभ मुहूर्त आणि पूजा विधि….

Laxmi Pujan 2026 मुहूर्त आणि तारीख 

तारीख: 8 नोव्हेंबर 2026.   

शुभ मुहूर्त: सायंकाळी 6:30 ते 9:30 .

Laxmi Pujan 2026 आणि लक्ष्मी कुबेर पूजन

बलीच्या बंदीवासातून माता लक्ष्मीची सुटका .

लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी व्रतांपैकी  एक पूजन आहे.

Laxmi Pujan 2026 साहित्य 

गंध ,अक्षदा ,हळदी ,कुंकू फुले (माता लक्ष्मीला शक्यतो पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कनेरी, झेंडू किंवा पांढरे रुई…) हे जास्त प्रिय आहे. तुळशीपत्र, निरंजन ,धूप, नागवेलीची पाने म्हणजेच विड्याची पाने, खारीक, बदाम ,पाण्याचा तांब्या, पैशाचे नाणे,फळे, नैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य खास करून दाखवला जातो ,साळीच्या लाह्या, बत्तासे आणि दिवाळीसाठी केलेले फराळाचे पदार्थ…

Laxmi Pujan 2026 मांडणी 

लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळातच करतात त्यामुळे पूजेची मांडणी पण प्रदोष काळातच करून घ्यावी. 

कुलदेवतेचा टाक.

जोड पानावर कुबेराची सुपारी .

लक्ष्मी चा फोटो.

सोने -चांदी ,पैसे.

नारळ स्वस्तिक काढलेला. 

झाडू त्यालाच केरसुनी असे पण म्हणतात. 

खडीसाखर खोबऱ्याच्या वाटीत ठेवलेली, लाह्या, बत्ताशे.

घरातल्या मंदिरासमोर एक मोठा चौरंग ठेवावा त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकून घ्यावे. 

चौरंगावर स्वस्तिक काढून पूजा करून आणलेला झाडू ठेवावा. चौरंगाच्या डाव्या बाजूला लक्ष्मी नारायण प्रतिमा ठेवावी, आपल्या कुलदेवतेचा टाक लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमे शेजारी ठेवावा. 

समोरच्या बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती अथवा प्रतिमा ठेवावी. मूर्तीच्या समोर नारळ ,पैसे सोने, चांदी, फळे हे ठेवावे. 

आपण जिथे पूजा मांडली आहे त्याच्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा ठेवावे. 

घरासमोर, तुळशी वृंदावना समोर, देवघरात आणि जिथे आपण लक्ष्मी मातेची पूजा म्हणजेच लक्ष्मी पूजन करणार आहेत तिथे पण दिवे लावून घ्यावे. 

लक्ष्मी मातेला घरातील वातावरण किंवा आजूबाजूचे वातावरण शांत लागते म्हणून घरात शांतता असावी.

Laxmi Pujan 2026 विधि 

लक्ष्मीपूजन सहसा प्रदूषकाळातच म्हणजेच सूर्यास्तापूर्वी काही वेळ आणि सूर्यास्तानंतर काही वेळ असा मानला जातो. 

पूजा आपण कधी पण तुलसी पूजनानेच करतो.

तुळशीला  हळदी ,कुंकू लावणे अक्षदा ,फुले ,धूप ,दीप लावून पूजा करावी. 

पूजेसाठी आणलेला नवीन झाडू म्हणजेच केरसुणी याची सुद्धा पूजा करून घ्यावी. 

प्रवेशद्वार म्हणजेच उंबऱ्याचे देखील पूजा करावी. 

गणेशाची स्थापना करावी, हळदी ,कुंकू ,गंध ,अक्षदा ,फुले गणेशाला अर्पण करून नमस्कार करून घ्यावा. 

माता लक्ष्मीची स्थापना करावी, हळदी, कुंकू, फुले, तुळशी पत्र वाहून गंध, अक्षदा, धूप ,दीप ओवाळून पुरणपोळी, लाह्या ,भत्ताशी ,फळे आणि दिवाळीला केलेले फराळाचे नैवेद्य अर्पण करावा.

माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. आरती महालक्ष्मी आरती | Mahalakshmi Aarti Marathi म्हणून पूजेची समाप्ती करावी.

मंत्र

ॐ महालक्ष्म्यै नमः ॥

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

कुबेर मंत्र

ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये।

धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥

About Us

https://www.facebook.com/share/p/1CUvvqZXDz

Laxmi Pujan 2026 Faq

लक्ष्मीपूजन कधी करावे? 

अश्विन महिन्यातील अमावस्येला (प्रदोष काळात) लक्ष्मीपूजन करणे सर्वोत्तम मानले जाते .

लक्ष्मीपूजन साठी कोणती मूर्ती वापरावेत? 

लक्ष्मीमाता ,श्रीगणेश आणि कुबेर यांच्या मूर्ती मांडावेत.

केरसुणीची पूजा का केली जाते? 

केरसुणी  देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते, ती घरातील अलक्ष्मी बाहेर घालवते .

Leave a Comment