दत्ताची आरती मराठी | Dattachi Aarti – Trigunatmak Trimurti Datta Ha Jana 

Dattachi Aarti With Lyrics In Marathi : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती 

Dattachi Aarti : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती 

Dattachi Aarti : दत्त आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असून ही मराठी संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण आरती आहे. Dattachi Aarti सुरुवात त्रिगुणात्मक त्र्यामूर्ती दत्त हा जाणार या ओळींनी होते आणि दत्तात्रय यांचे या आरती मध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूपाचे असे वर्णन केले गेले आहे. दत्त आरती विशेषतः गुरुवारी, दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला म्हटले जाते.

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।

अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥

पराही परतली तेथे कैचा हा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ 

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

Dattachi Aarti Image

Dattachi Aarti : दत्त आरतीबद्दल प्रश्न

Dattachi Aarti (दत्त आरती कोणी रचली )?  

दत्त आरती ही संत एकनाथ महाराजांनी रचली आहे.

आरती कधी म्हणतात

गुरुवारच्या दिवशी, दत्तजयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा) व गुरु पौर्णिमेला म्हणतात.

आरतीतील प्रमुख संदेश ?

भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकत्रित रूप आणि  गुरु आहेत.

About Us

https://pin.it/6Im711MrN

Leave a Comment