श्री देवीची आरती/दुर्गे दुर्घट भारी |Devichi Aarti – Durge Durghat Bhari 

Devichi Aarti

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥ 

दुर्गादेवीची आरती ही देवीचे विविध शक्ती रूपाचे वर्णन करणारी आरती आहे.

नवरात्र उत्सवात महाराष्ट्रात दुर्गा अष्टमी आणि इतर पूजेच्या वेळेस ही आरती भक्ती  आरती  म्हणतात.

Devichi Aarti (दुर्गादेवी आरती FAQ)

दुर्गादेवीची आरती कोणी रचली?

दुर्गादेवीची आरती पारंपरिक रूपात संतांनी रचलेली आहे ,आणि ती लोकपरंपरेतून पुढे आली आहे.

Devichi Aarti (देवीची आरती कधी म्हणतात?) 

महाराष्ट्रात नवरात्र उत्सवात प्रत्येक दिवशी ही आरती बोलली जाते, तसेच दुर्गाष्टमी आणि देवींच्या मंदिरात नित्य नियमाने सकाळी आणि संध्याकाळी आरती बोलली जाते.

Devichi Aarti (दुर्गादेवीच्या आरती ची सुरुवात कशी होते?)

दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी या ओळीनेआरतीची सुरुवात होते.

About Us

https://pin.it/6BTlNlxa8

Leave a Comment