विठ्ठलाची आरती “युगे अठ्ठावीस” | Vitthal Aarti Yuge Atthavis 

Vitthal Aarti

युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।1।।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनि कटी ।

कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरूड हनूमंत पुढे उभे राहती ।।2।। 

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

धन्य वेणुनाद अनुक्षेपत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवाळिती राजा विठोबा सावळा ।।3।।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।

चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। 4।।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।।5।।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

Vitthal Aarti ॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥

vitthal image

Vitthal Aarti FAQ

विठ्ठल आरती कोणी रचली? 

संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि वारकरी संतांनी रचलेल्या अभंगांवर आधारित  विठ्ठल आरती आहे. 

आरतीचा अर्थ काय आहे?

भक्ती, सेवा आणि समर्पणाचे स्तवन, आरतीत त्याचे स्तवन केले जाते.

विठ्ठल आरतीबरोबर  कोणते अभंग म्हणतात?

“जय जय राम कृष्ण हरी”, “अवघा रंग एकचि झाला” , “पांडुरंग पांडुरंग” यांसारखे अभंग लोकप्रिय आहेत.

Leave a Comment