Khandoba Aarti : Lyrics in marathi 2026 : खंडोबाची आरती

जय देवा खंडेराया । निजशिवरुप सखया ॥

आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ॥ धृ. ॥

देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर ।

तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥

उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार ।

भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥

स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर ॥

अद्वैतबोध तीव्र । हाती घेउनि तरवार ॥

अहंकार मल्लासूर । त्यातें मारिसी साचार ॥

निवटुनी दैत्यगार । विजयी होसी तूं मल्हार ॥ जय. ॥ २ ॥

निरसोनी द्वैत भाव । करिसी तूं ठाणे अपूर्व । 

अद्वैतची भक्तदेव ।भेदबुद्धी मिथ्या वाव ।

तुजवीण न दिसे कोणी । जगिं या एकचि तू धणी ॥

मौनी म्हणे तुची सर्व । अससी व्यापक खंडेराव ॥ जय देवा. ॥ ३ ॥

Khandoba Aarti Image

About Us

https://www.facebook.com/share/p/19aGjxkGX2

खंडोबाची आरती मध्ये कोणता जयघोष केला जातो?

“येळकोट येळकोट जय मल्हार” आणि “सदानंदाचा येळकोट” हा जयघोष प्रामुख्याने केला जातो.

खंडोबाची आरती मध्ये ‘भंडारा’ (हळद) का वापरतात?

भंडारा (हळद) हे खंडोबाचे मुख्य प्रतीक मानले जाते. तो सोन्यासारखा पिवळा आणि पवित्र असतो.

खंडोबाची आरती कोणत्या दिवशी करणे विशेष मानली जाते?

खंडोबाची आरती आणि पूजा रविवार या दिवशी शुभ मानली जाते, रविवार खंडोबाचा वार आहे. चंपाषष्टी आणि सोमवती अमावस्या या दिवशी खंडोबाची विशेष आरती व पूजा केली जाते.

Leave a Comment