Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशी) 2026 गणेशोत्सवाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि शेवटचा.
भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन ही या दिवशी केले जाते.
Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशीचे महत्त्व):
गणेशाचे विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी केले जाते.
भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा देखील आजच केली जाते.
Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशी) पूजेची विधी:
- सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे.
- पूजेच्या जागी पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र टाकावे आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावे.
- फुले ,अक्षदा ,तुळशी पत्र अर्पण करावे.
- नैवेद्य दाखवून आरती करावी.
- 14 गाठी असलेला अनंताचा दोरा पुरुषांनी उजव्या आणि स्त्रियांनी डाव्या हातात बांधावा.
Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशी )2026 पूजेची वेळ:
अनंत चतुर्दशी शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी आहे. पूजा मुहूर्त सकाळी 11 वाजून 13 मिनिटात ते दुपारी एक वाजून 37 मिनिट कसा आहे.
वार आणि वेळ:
दिनांक 25 सप्टेंबर 2026 शुक्रवार .
पूजा मुहूर्त: 11:13 ते 1: 37.
Anant Chaturdashi अनंत चतुर्दशी पूजेचे साहित्य:
- पाठ व स्वच्छ वस्त्र पिवळी किंवा लाल कलर.
- कलश ,नारळ व आंब्याची पाने.
- भगवान विष्णू आणि अनंताची प्रतिमा.
- हळदी, कुंकू ,अक्षदा.
- फुलांचा हार , फुले आणि तुलसी पत्र.
- तुपाचा दिवा आणि धूप.
- पंचामृत.
- नैवेद्य आणि फळे.
- अनंताचा दोरा.
- सुपारी, विड्याचे पाने.
- आरतीसाठी ताट आणि कापूर.
अनंत चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना हा मंत्र म्हटला जातो:
“अनंत संसार महासमुद्रे मग्नं समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजयस्व ह्रानंतसूत्राय नमो नमस्ते ”।।
अनंत चतुर्दशी व्रत कथा:
भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला अनंत चतुर्दशी व्यक्त केले जाते. भगवान विष्णूची पूजा करून आनंताचा धागा बांधला जातो. अनंत चतुर्दशीच्या व्रताशी संबंधित लोककथा आहे.
अध्यात्मिक आणि पौराणिक कथा प्रमाणे प्राचीन काळे सुमंत नावाचे ऋषी होते त्यांची पत्नी दीक्षा होते. काही वेळानंतर दक्षिणे एका सुंदर मुलीला जन्म दिला, त्या मुलीचे नाव सुशीला असे ठेवले, काही काळानंतर सुशिरावरून तिच्या आईची सावली नाहीशी झाली. ऋषींना मुलीच्या संगोपनाची चिंता वाटू लागले म्हणून त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची दुसरी पत्नी आणि सुशीलाच्या सावत्र आईचे नाव कर्कशा होते. कर्कशा नावा प्रमाणेच स्वभावाने कठोर होती. काही वेळानंतर सुशीलाही मोठे होऊ लागली आणि तो दिवस आला जेव्हा ऋषी सुमंतला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली.
प्रयत्नानंतर सुशीलाचा कौडिन्य ऋषी सोबत विवाह संपन्न झाला.
पण सुशीलेला गरिबीचा सामना करावा लागला त्यांना जंगलात भटकावे लागले .एके दिवशी त्यांनी काही लोकांना अनंत देवाची पूजा करताना पाहिले आणि हातात अनंत रक्षा सूत्र (अनंत धागा) बांधत आहेत. अनंताच्या व्रताचे महत्त्व जाणून ,उपासनेची पद्धत विचारली आणि तिचे पालन करून तिने अनंत रक्षा सूत्र मनगटावर बांधले. वेळातच तिचे दिवस उलटले ऋषी कौडिन्य यांना अभिमान वाटू लागला की हे सर्व आपल्या कष्टाने निर्माण केले आहे. पुढच्या वर्षीही सुशीलाने अनंत चतुर्दशीला अनंताचे आभार मानले आणि त्यांची पूजा करून अनंत रक्षा सूत्र बांधून घरी परतले.
कौडिन्य ऋषींनी हातात अनंत धागा बांधलेला पाहून विचारले. आनंदाने सुशील यांनी सांगितले की हे रक्षासूत्र अनंत देवाची पूजा करून बांधले आहे, आणि यानंतरच आपले भाग्य इतके चांगले झाले आहे चांगले दिवस आले आहेत. त्यावर कौडिन्य अपमान वाटू लागला की सुशीला आपल्या मेहनतीचे श्रेय तिच्या अनंताच्या पूजेला देत आहे.
त्यांनी तो धागा रागात काढून टाकला त्यामुळे भगवान अनंत क्रोधित झाले आणि काही वेळातच कौडिन्य सिंहासनावरून जमिनीवर पडले.
एका विद्वान ऋषींनी त्यांना त्यांचे कृतीची जाणीव करून दिली आणि त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप करण्यास सांगितले. नंतर कौडिन्य ऋषींनी सलग 14 वर्षे अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यानंतर भगवान श्री हरी प्रसन्न झाले आणि कौडिन्य आणि सुशीला पुन्हा सुखात राहू लागले.
Anant Chaturdashi Image

Anant Chaturdashi Faq:
अनंत चतुर्दशी २०२६ कधी आहे?
२०२६ मध्ये २५ सप्टेंबर, शुक्रवार रोजी आहे.
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे?
२५ सप्टेंबर रोजी सकाळी ६:२८ ते १०:५९ पर्यंत शुभ आहे .
अनंत चतुर्दशीला कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
श्री विष्णूचे रूप असलेल्या ‘अनंत’ रूपाची पूजा केली जाते .