Navratri Aarti 1 | नवरात्री आरती मराठी

Navratri Aarti 

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो

उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||

अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो

प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो

मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो

ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो  || १ ||

द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो

सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो

कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो

उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो

मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो

कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो

अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||

चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो

उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो

पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो

भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो

अर्ध पाद्य​ पूजेने तुजला भवानी स्तवती हो

रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो

आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||

षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो

घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो

कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो

जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो

तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो

जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो

भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||

अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो

सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो

मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो

स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो

सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो

षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो

आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||

दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो

सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो

शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो

विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||

Navratri Aarti Image

Navratri Aarti Faq 

Navratri (नवरात्रीमध्ये )कोणती आरती विशेषतः गायली जाते?

Navratri Aarti “उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ” ही आरती आणि “दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ” आरती विशेषतः गायली जाते.

Navratri नवरात्रीमध्ये नऊ दिवसात काय विशेष असते? 

घटस्थापनेपासून ते नवमीपर्यंत रोज देवीच्या विविध “ रूपांचे आणि शृंगाराचे ” विशेषतः गोंधळ जोगवे यांचे महत्त्व  या नऊ दिवसात असते.

Navratri Aarti का केली जाते? 

Navratri Aarti म्हणजे अंधार दूर करणे आणि आरती हा शब्द  “आरात्रिक ”  असा असून तो संस्कृत भाषेमधील आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून समृद्धीसाठी आरती केली जाते.

About Us

https://www.facebook.com/share/p/19PEE7aZad

1 thought on “Navratri Aarti 1 | नवरात्री आरती मराठी”

Leave a Comment