Shankarachi Aarti / शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
Shankarachi Aarti / शंकराची आरती

Shankarachi Aarti / शंकराची आरती FAQ
Shankarachi (शंकराची आरती कोणी रचली)?
समर्थ रामदास स्वामींनी ही आरती रचली आहे.
आरतीचा भावार्थ काय आहे?
शिव हे विश्वाचा रक्षक, भोळा पण प्रलयकारी शक्ती.आरती मध्ये त्यांच्या भव्यतेची वर्णन केले जाते.
आरती मध्ये शिवाचे कोणते रूप वर्णन केले आहे?
व्याघ्रांबर,निळकंठ, त्रिनेत्र, भोळा शंकर अशा रूपांचे वर्णन केले आहे.